लहान मुलांमध्ये आढळतोय MIS-C आजार; पुण्यात आढळले रुग्ण...
- MahaLive News
- Jun 4, 2021
- 2 min read

#पुणे- कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पाश्वभूमीवर लहान मुलांना कोरोनाचा धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत घट होत असली तरी दुसऱ्या लाटेत लहान मुलांना संर्सग होण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि पुणे कोविड पेडियाट्रिक टास्क फोर्स तज्ज्ञ सज्ज आहे. दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या लहान मुलांमध्ये मल्टी सिस्टीम इन्फ्लामेटरी सिड्रोम (MIS-C) लक्षणीय आजार होत असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे या आजाराची लक्षणे आढळलेल्या प्रत्येक रुग्णांची नोंद होणे आवश्यक आहे अशी माहिती टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिली आहे. देशात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे आरोग्य सेवा महासंचालक डॉ सुनिल कुमार यांनी 2 जूनला राज्य आरोग्य संचालकांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी मल्टी सिस्टीम इन्फ्लामेटरी सिड्रोम (MIS-C) या आजाराकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगितले असून उपचारासाठी आवश्यक सुविधा आणि तज्ज्ञ उपलब्ध आहेत अशा सेंकडरी आणि टेरेट्री केअर इन्सिट्यूट शोध मोहीम देखील सुरु करण्याचा सल्ला दिल्ला आहे. ''कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये गंभीर समस्या उद्भवल्याचे समोर आले आहे. तरीही याबाबत अद्यापही इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हेलन्स पोर्टलवर (IDSP) किंवा दुसऱ्या कोणत्याही पोर्टलवर नियमित माहिती नोंदवली जात नाही. राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात आढळलेली MIS-C च्या नव्या रुग्णांची आठवड्याची आकडेवारी जाहीर करण्याची विनंतीही डॉ. कुमार यांनी या पत्रातून केली आहे. सेंटर फॉर डिसिज कंट्रोल आणि प्रिव्हेंनशन (CDC)नुसार,लहान मुलांना मल्टी सिस्टीम इन्फ्लामेटरी सिड्रोमचा संसर्ग झाल्यास, ह्रदय , फुफ्फुस, किडनी, मेंदू आणि लैंगिकदृष्ट्या कार्यशील अवयवसह शरीराच्या विविध अवयवांची आग होऊ शकते. तसेच MIS-C संसर्गित मुलांमध्ये ताप, पोटदूखी, उलटी, जुलाब, मान दूखी, पुरळ, डोळे लाल होणे आणि नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणे अशी लक्षणे आढळू शकतात. CDCने एका वृत्तपत्राला दिलेल्या माहीतनुसार, MIS-C संर्सगाची कारणे माहित नव्हते, परंतू कोरोनामुक्त झालेल्या मुलांना आजार होत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील इंडियन अॅकडमी ऑफ पेडियाट्रिक्स (आयएपी) चे अध्यक्ष डॉ. संजय नातू आणि कोरोना टास्क फोर्सच्या सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 15 दिवसात शहारात विविध रुग्णालयामध्ये आढळणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अंशत: वाढले आहे. “आम्ही शहरात स्थानिक नोंदणीची योजना आखत आहोत असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. पुणे कोविड पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या अध्यक्षा डॉ. आरती किणीकर यांनी सांगितले की, ''अशा आजाराच्या रुग्णांची शोध मोहीम ही महत्त्वाचे पाऊल आहे. जोपर्यंत MIS-C रुग्णांची नोंद करणे बंधनकारक होत नाही तोपर्यंत खात्रीशीर आणि पुरेसशी माहिती मिळणार नाही.'' गेल्या 15 दिवसांमध्ये ससून रुग्णालयात गंभीर अवस्थेतील MIS-C संसर्गित रुग्णांची नोंद झाली आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. भारती रुग्णालयाचे उप वैद्यकीय संचालक डॉ जितेंद्र ओसवाल,'' रुग्णांनी घाबरून जाऊ नका पण, काळजी घ्या. आयएपीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, या आजाराचा संसर्ग झालेल्या आणि ताप आलेल्या लहान मुलांनाकडे विशेषत: लक्ष देण्याची आवश्यकता आहे''
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज पुणे

Comments