top of page

औरंगाबाद येथे वाढलेल्या इंधन दरवाढीचा विरोध व महागाई विरोधात काँग्रेसचे अनोखे आंदोलन...

Jul 8, 2021
1 min read

औरंगाबाद- इंधन दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंच्या महागाई विरोधात औरंगाबाद शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी सरदार वल्लभ भाई पटेल पुतळा, शाहगंज ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव तसेच गॅसचे वाढलेले भाव याविरोधात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यव्यापी जनआंदोलन करण्यात येत आहे. औरंगाबाद येथे वाढलेल्या इंधन दरवाढीचा विरोध करण्याकरिता नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी बैलगाडी, घोडे, उंट आणि सायकल ई. चालवून रॅली काढली. व निषेध व्यक्त केला. "बहुत हुई महांगाई की मार, बस करो मोदी सरकार, कहा गये भाई कहा गये अच्छे दिन कहा गये?" अशी घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या आंदोलनाला कॉग्रेसच्या महिला कार्यकर्त्या, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज औरंगाबाद

Mahalive News

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

🔴 LIVE लातूर दुमदुमलं! गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक- 2026 | गणपती बाप्पा मोरया!
bottom of page