top of page

झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नये; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन...

Aug 5, 2021
1 min read

मुंबई- कोरोनाच्या संकटात झिका व्हायरसचा रुग्ण पुण्यात आढळल्याने चिंता व्यक्त होत आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. झिका व्हायरसमुळे घाबरून जाऊ नये. या आजाराचे संक्रमण झालेले नसून त्याचा प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत उपाययोजना सुरू आहेत, असे राजेश टोपे म्हणाले. पुणे जिह्यातील पुरंदर तालुक्यात बेलसर येथे झिका विषाणूचा रुग्ण आढळला आहे. एका 50 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली असून हा राज्यातील पहिला रुग्ण आहे. झिकाचा रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तीन सदस्यांचे पथक पाहणीसाठी आले आहे. या भागात डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करण्यावर भर देण्यात येत असून लक्षणानुसार उपचार केले जात आहेत, असेही राजेश टोपे यांनी सांगितले. कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीचीही त्यांनी माहिती दिली. 'राज्यात कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे या चार जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी दर जास्त असून या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यानुसार यंत्रणेला कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत या चारही जिल्ह्यांत सध्या कोरोना रुग्णसंख्या राज्यातील अन्य जिल्ह्यांपेक्षा जास्त आढळून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेमार्फत 'ट्रॅकिंग,टेस्टिंग आणि ट्रीटमेंट' या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जात आहे. या चारही जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना नोडल अधिकाऱयांना देण्यात आल्या असून जास्तीचे लसीकरण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत, असे निर्देश देण्यात आले आहे. कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर ज्या देशांमध्ये लसीकरण जास्त झाले तेथे तिसरी लाट आली तरी तिचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यामध्ये अधिकाधिक लसीकरण करण्यावर भर देण्यात येत असून अखंडितपणे लस पुरवठय़ासाठी पेंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जात असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

🔴 LIVE लातूर दुमदुमलं! गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक- 2026 | गणपती बाप्पा मोरया!
bottom of page