शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज; ७ कोटी लोकांना मिळणार प्रत्यक्ष लाभ...
- MahaLive News
- Oct 4, 2022
- 1 min read

मुंबई- मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्वाचे निर्णय घेण्यात आले. शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. राज्यात शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज देण्यात येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येईल. हाही निर्णय घेण्यात आला. १ कोटी ७० लाख कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होईल. रवा, चणाडाळ, साखर व तेल प्रत्येकी एक किलो पॅकेज हे केवळ शंभर रुपयांत देण्यात येणार आहे. याचा निर्णय आज घेण्यात आला. याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनातील प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र किंवा राज्य सरकारच्या कंपन्यांना प्रकल्प अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नेमण्याचा निर्णय झाला. पोलिस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना पूर्वीप्रमाणेच घरबांधणीसाठी बँकांमार्फत कर्ज देण्यात येईल. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पास गती मिळणार आहे. त्यासाठी सुधारित खर्चास मान्यता देण्यात आली.
©महालाईव्ह न्युज मुंबई
Comments