top of page

कोरोनाचि चिंता वाढली; एका आठवड्यात रुग्णसंख्येत 32 टक्के वाढ; मागील 24 तासांत 43 हजार कोरोना बाधित..


ree

मुंबई- दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी झाल्यानंतर ठिकठिकाणी निर्बंध शिथिल करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी वर्दळ वाढली आहे. याचा परिणाम कोरोना रुग्णसंख्येवर दिसून आला असून, एका आठवड्याच्या कालावधीत देशातील रुग्णसंख्येत 32 टक्के वाढ झाली आहे. तर मागील 24 तासांत जवळपास 43 हजार रुग्ण आढळून आले आहेत. भारतात मागील 24 तासांत 42 हजार 909 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात पहिल्या पाच राज्यांमध्ये केरळ पहिल्या क्रमांकावर आहे. केरळमध्ये 29 हजार 836 रुग्ण एका दिवसात आढळून आले आहेत. केरळनंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात 24 तासांत 4 हजार 666 आढळले आहे. त्यानंतर आंध्र प्रदेशात 1 हजार 557, तामिळनाडू 1 हजार 538 आणि कर्नाटकात 1 हजार 262 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात 24 तासांच्या कालावधीत 380 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात नोंदवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात 131 मृत्यू झाले आहेत. तर केरळमध्ये 75 मृत्यूंची नोंद झाली आहे. देशाचा सध्याचा रिकव्हरी रेट 97.51 टक्के इतका आहे. आठवडाभरात रुग्णसंख्येत वाढ देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आकडेवारीत समोर आलं आहे. मागील आठ आठवड्यांच्या तुलनेत मागील आठवड्यात रुग्णसंख्या सर्वाधिक वाढली आहे. महत्त्वाचं म्हणजे या रुग्णसंख्येपैकी दक्षिण भारतातील रुग्ण सर्वाधिक आहे. मागील आठवड्यात देशात 2.9 लाख कोरोना रुग्ण आढळून आले. ही संख्या त्या आधीच्या आठवड्याच्या तुलनेत 32 टक्के जास्त आहे. देशातील विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला, तरी पहिल्या पाच राज्यांत रुग्णवाढ होताना दिसत आहे. देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी 90.55 टक्के रुग्णसंख्या पहिल्या पाच राज्यातील आहे. यात केरळचा वाटा 69.53 टक्के इतका आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील रुग्णसंख्या चार ते पाच हजारांच्या दरम्यान स्थिरावली आहे. रविवारी दिवसभरात ३ हजार ५१० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६२ लाख ६३ हजार ४१६ इतकी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या ९७ टक्के इतका आहे, तर मृत्यूदर सध्या २.१२ टक्के इतका आहे.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

ree

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page