बारावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला; पहा कसा लागणार निकाल...
- MahaLive News
- Jul 2, 2021
- 1 min read

पुणे- कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून दहावी आणि बारावी इयत्तेच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, याच्या निकालाचे निकष काय असतील, याबाबत विद्यार्थ्यांना स्पष्टता नव्हती. आता राज्य शिक्षण मंडळाकडून बारावी निकालाचे निकष जाहीर करण्यात आले आहेत. सीबीएसई मंडळाप्रमाणे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या सूत्रावर आधारित असणार आहे. बोर्डाच्या परीक्षेशिवाय बारावीचा निकाल लावण्याचे कोडे राज्य सरकारने अखेर सोडविले आहे. ३० टक्के दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेतील मिळालेले गुण, ३० टक्के अकरावीच्या अंतिम परीक्षेचे गुण आणि ४० टक्के बारावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनातील गुण, यानुसार बारावीचा निकाल लावला जाणार आहे. एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन सीबीएसई बोर्डाप्रमाणे 30:30:40 याच फॉर्म्युल्यानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज पुणे
Mahalive News
Comments