मराठा-ओबीसी विद्यार्थ्यांना 50 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय...
- MahaLive News
- Jul 2, 2021
- 1 min read

पुणे- अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेत यावर्षी प्रवेश घेणाऱ्या शिर्डी विधानसभा मतदार संघातील मराठा आणि ओबीसी विद्यार्थ्याची 50 टक्के शुल्क माफ करण्याचा निर्णय संस्थेचे चेअरमन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज जाहीर केला. राज्यात अनेकांच्या शिक्षण संस्था आहेत. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघापुरता या पद्धतीने निर्णय घेतला तर राज्यभरातील विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. आरक्षण रद्द झाल्यांनतर उगाच सल्ले देत फिरण्यापेक्षा सामाजिक जबाबदारी म्हणून हा निर्णय घेतल्याचे विखे-पाटील स्पष्ट केले. आरक्षण टिकविण्यात आलेल्या अपयशाचे प्रायश्चित म्हणून आघाडी सरकारने देखील विद्यार्थ्याची या वर्षाची संपूर्ण शैक्षणिक फी भरावी आशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज पुणे
Comments