लसीकरणात महाराष्ट्राचा विक्रम; ३ कोटी नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र ठरले देशातील पहिले राज्य..
- MahaLive News
- Jun 25, 2021
- 1 min read

मुंबई- देशात लसीकरण सुरु होऊन पाच महिने पूर्ण झाले आहेत. यामध्ये सुरुवातीला फ्रंट लाईन वर्कर आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. तर आता १८ वर्षावरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण सुरु झाले आहे. यामध्ये शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत राज्यातील ३ कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ३ कोटी नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे. आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी ही माहिती दिली आहे. गुरुवारी ४ लाख २० हजार ९६० नागरिकांना लस देण्यात आली. यानंतर लस घेणाऱ्या नागरिकांचा आकडा २ कोटी ९७ लाख २३ हजारांवर पोहोचला होता. शुक्रवार दुपारी २ वाजेपर्यंत राज्यात झालेल्या लसीकरणानंतर हा आकडा ३ कोटी २७ हजार २१७ झाला. याआधी महाराष्ट्राने बुधवारी एकाच दिवशी ६ लाख १७ हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम केला होता. तर मुंबईने लसीकरणात दरदिवशी एक लाख मुंबईकरांना लस देण्याचे आपले उद्दिष्ट गाठले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Comments