top of page

डेल्टा प्लसमुळे निर्बंधांमध्ये पुन्हा मोठे बदल; राज्य सरकारचे नवे आदेश...


ree

मुंबई- कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर मागील काही दिवसांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यापाठोपाठ काही जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस कोरोना विषाणू आढळून आल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता पॉझिटिव्हिटी रेट किंवा बेड ऑक्युपन्सीचं प्रमाण कितीही कमी असलं, तरी राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिका पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या गटाच्या वरच असणार आहेत. सरकारने स्थानिक प्रशासनाला निर्बंध कमी करण्याबाबत किंवा वाढवण्याबाबत देखील फक्त RT-PCR चाचण्यांमधून समोर आलेल्या निष्कर्षांनाच आधारभूत मानण्याचे निर्देश दिले आहेत. आजच्या निर्देशांनुसार आता निर्बंध कमी करायचे असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून २ आठवड्यांच्या आकडेवारीचा आढावा घेतला जाईल. त्यानुसार निर्णय घेतले जातील. पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर देणे, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करणे, कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन देणे. टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करणे. हवेमधून पसरू शकणाऱ्या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करणे. मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर प्रभावीपणे दंड आकारणे. गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे. कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घ्या. जेणेकरून ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील. राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण सापडल्यामुळे त्यासंदर्भात सरकारने तातडीची पावलं उचलण्यास सुरुवात केली आह.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page