top of page

राहुल गांधींवरील कारवाईविरोधात विधानसभेत सभात्याग; विधानसभेच्या पायऱ्यांवर मूक आंदोलन...

Mar 25, 2023
1 min read

मुंबई- राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेससह विरोधी पक्षांनी विधानसभेतून सभात्याग करत निषेध केला. लोकशाहीच्या विरोधात हा निर्णय असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. विधानसभेतून सभात्याग केल्यानंतर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर केंद्र सरकार आणि भाजपविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले.


त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांनी काळ्या फिती लावून विधानसभेच्या कामकाजात सहभाग घेतला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्याप्रकरणी विधीमंडळाच्या आवारात आज विरोधकांनी तोंडाला काळ्या फिती लावून मूक आंदोलन केलं. यावेळी हातात निषेधाचे फलक घेऊन विरोधकांनी कोणतीही घोषणाबाजी न करता आंदोलन केलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलो यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे.


दरम्यान, कालच राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयानं रद्द केली. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी तोंडाला काळी रिबीन बांधून पायऱ्यांवर आंदोलन केलं. राहुल गांधींवर झालेली कारवाई 'लोकशाहीची हत्या' असे बोर्ड घेऊन कोणतीही घोषणा न देता विरोधक मूक आंदोलन करत आहेत.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

🔴 LIVE लातूर दुमदुमलं! गणेश विसर्जनाची भव्य मिरवणूक- 2026 | गणपती बाप्पा मोरया!
bottom of page