ITI प्रवेश प्रक्रियेला मोठी गती; मराठवाड्यात ८ दिवसांत २० हजार विद्यार्थ्यांची नोंदणी...
- MahaLive News

- Jul 24, 2021
- 1 min read

औरंगाबाद- आयटीआय प्रवेश प्रक्रियेची नोंदणी १५ जुलैपासन सुरू झाली आहे. यंदा मराठवाड्यातील एकूण १३९ आयटीआय संस्थांमध्ये २० हजार २६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. २३ तारखेपर्यंत मराठवाड्यातील तब्बल वीस हजार हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आयटीआयची प्रवेशप्रक्रिया १५ जुलैपासून सुरू झाली. इयत्ता दहावीच्या निकालानंतर प्रवेश प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे.त्यामुळे आपल्या आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यंदा मराठवाड्यातील ८२ शासकीय आयटीआयमध्ये १४ हजार, तर ५७ खासगी आयटीआयमध्ये पाच हजार ६०८ अशा एकूण २० हजार २६४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. मागील आठवडाभरात २० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. आयटीआयमध्ये जिल्ह्यातील स्थानिक ९० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून परजिल्ह्यातील दहा टक्के विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असणार आहेत. कोरोनामुळे दहावीची परीक्षा न झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. यंदा दहावीच्या परीक्षेत मराठवाड्यातून सुमारे तीन लाख चांगल्या मार्काने विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना सीईटीची अट घातली आहे; पंरतु आयटीआयच्या प्रवेशाला अकरावीप्रमाणे सीईटीसारखी अट नसल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आयटीआय प्रवेशाला पसंती मिळत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आयटीआय प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज येतील, अशी शक्यता आयटीआयच्या प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्हा शासकीय संस्था व जागा खासगी संस्था व जागा
▪️ औरंगाबाद संस्था ११, जागा २२२४ संस्था-६, जागा-४३६
▪️ बीड संस्था-१२, जागा २१०८ संस्था-१४, जागा-१२१६
▪️ हिंगोली संस्था-६, जागा ६७२ संस्था-२, जागा २४८
▪️ जालना संस्था-८, जागा १३४४ संस्था-४, जागा १६४
▪️ लातूर संस्था-११,जागा २४०४ संस्था-११, जागा १३००
▪️ नांदेड संस्था-१७, जागा २५३२ संस्था-७, जागा १३२४
▪️ उस्मानाबाद संस्था-८, जागा-१७८४ संस्था-९, जागा ५९२
▪️ परभणी संस्था-९, जागा-१५८८ संस्था-४, जागा ३२८जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज औरंगाबाद
Mahalive News

























Comments