मराठवाड्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; बुधवारी दिवसभरात ४०५ कोरोनाबाधित रुग्ण...
- MahaLive News
- Jun 24, 2021
- 1 min read

औरंगाबाद- मराठवाड्यात बुधवारी (ता. २३) दिवसभरात ४०५ कोरोनाबाधित आढळले. जिल्हानिहाय वाढलेल्या रुग्णसंख्येत बीड १४८, उस्मानाबाद ९८, औरंगाबाद ५९, लातूर ३६, नांदेड-परभणी प्रत्येकी २३, जालना १४, हिंगोली ४ जणांचा समावेश आहे. उपचारादरम्यान आणखी तेरा जणांचा मृत्यू झाला. त्यात औरंगाबादेत पाच, उस्मानाबाद-बीड-जालन्यात प्रत्येकी दोन, लातूर-परभणीत प्रत्येकी एकाचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ५९ रुग्णांची भर पडली. त्यात शहरातील ८, ग्रामीण भागातील ५१ जण आहेत. रुग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ६६६ वर पोचली. बरे झालेल्या आणखी १०३ जणांना सुटी झाली. त्यात शहरातील १४, ग्रामीण भागातील ८९ जणांचा समावेश आहे. आजपर्यंत १ लाख ४१ हजार ३७० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८९२ जणांवर उपचार सुरू आहेत.

आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. बाबरा (ता. फुलंब्री) येथील पुरुष (वय ४०), सोनारी (ता. फुलंब्री) येथील पुरुष (७०), राहतगाव (ता. पैठण) येथील पुरुषाचा (६९) घाटीत तर वेदांतनगरातील पुरुष (५४), चापानेर (ता. कन्नड) येथील पुरुषाचा (६०) खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. आजपर्यंत ३ हजार ४०४ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज औरंगाबाद
Mahalive News
Comments