शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून 157 कोटींची मदत जाहीर...
- MahaLive News
- Nov 24, 2022
- 1 min read

मुंबई- बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. आता राज्य सरकारने या शेतकऱ्यांसाठी 157 कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील काही भागात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं कापूस सोयाबीन पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. मात्र, सरकारनं शेतकाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही, असा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. त्याचबरोबर सोयाबीन आणि कापसाला भाव नाही. रब्बी हंगामात शेतकऱ्यांना रात्रीची नव्हे तर दिवसाची लाईट पाहिजे, अशा अनेक मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना एक महिन्यांपासून करीत आहे.

मात्र, सरकार याची कोणतीही दखल घेत नाही, असा आरोप देखील तुपकर यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळं रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांना घेऊन मुंबईमधील अरबी समुद्रात जल आंदोलन करणार आहे. जिरायत पिकांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 27000 हेक्टर आणि बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रुपये प्रति हेक्टर मदत सरकारने जाहीर केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मंत्रालयाशेजारील समुद्रात जलसमाधी आंदोलन करणार असून यासाठी ते मुंबईला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर केली. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 157 कोटीची मदत सरकारने जाहीर केली आहे. दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिरायत पिकांसाठी 13600 रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांसाठी 27000 हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी 36000 रुपये प्रति हेक्टर मदत सरकारने जाहीर केली आहे
Comments