top of page

एमपीएससीच्या विध्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; या उमेदवारांना प्रमाणपत्र सादर करावं लागणार...


ree

मुंबई- एसपीएससीच्या ८१७ पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. त्यावर आता एमपीएससीने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसेवा पुर्व परीक्षा २०२० आणि एमपीएससी गट ब २०२० साठी अर्ज केलेल्यांसाठी एमपीएससीने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या उमेदवारांनी अनाथ प्रवर्गातून अर्ज भरला आहे, अशा उमेदवारांना आता आयोगासमोर प्रमाणपत्र सादर करावं लागणार आहे. येत्या 27 तारखेच्या आत प्रमाणपत्रसादर करावं लागणार आहे. उमेदवार सादर न करू शकल्यास ते अपात्र ठरवले जाणार आहेत.मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सवलतीचा उपाय म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या आरक्षणासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन पर्याय देऊ केले आहेत. उमेदवारांना एक तर आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल किंवा त्यांना खुल्या प्रवर्गाचा म्हणजे ओपन पर्याय निवडावा लागणार आहे. राज्यसेवा आयोगाने काही दिवसांपुर्वी ८१७ जागांची शिफारस केली होती. त्यानंतर आता एसपीएससीच्या ८१७ पदांची भरती लवकरच केली जाणार आहे. एमपीएससीमार्फत लवकरच 15,511 पदांसाठी मेगा भरती होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली होती. दरम्यान, कोरोना महामारीमुळे सर्वच विद्यार्थ्यांचं भवितव्य ऐरणीवर आलं होतं. कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या प्रादुर्भावामुळे कित्येक परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यानं स्वप्नील लोणकर या युवकाने आत्महत्या केल्यानंतर राज्यातील वातवरण चांगलंच तापलं होतं.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

ree

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page