मुंबईतील गोवंडी भागात इमारत कोसळून चौघांचा मृत्यू तर दहा जण जखमी...
- MahaLive News
- Jul 23, 2021
- 1 min read

मुंबई- गोवंडी भागात इमारत कोसळून 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत दहा जण जखमी झाले आहेत. अहिल्या बाई होळकर मार्गाला लागून असलेले हे दुमजली घर कोसळले. शिवाजी नगर, गोवंडी परिसरात 1+1 स्ट्रक्चर असलेली इमारत पहाटे पाच वाजेच्या सुमारास कोसळली. या घटनेत चौघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी आहेत. यातील 7 जणांना राजावाडी हॉस्पिटलमध्ये तर तिघांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान, शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी यात अडकलेल्यांना बाहेर काढले सहा तास हे बचाव कार्य सुरू होते. हे बचाव कार्य आता संपले असले तरी मलबा काढण्याचे काम सध्या सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या आठवडाभरापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडीमध्ये पावसाची संततधार सुरु आहे. यामुळं अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मागील आठवड्यात चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये 25 जणांना मृत्यू झाला होता. चेंबूरमध्ये दरड कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून सात जणांचा मृत्यू झाला होता. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून 16 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments