मुंबई-गोवा महामार्गावर बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात...
- MahaLive News
- Oct 23, 2022
- 1 min read

मुंबई- पनवेलजवळ एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ठाणे-सांगली बस क्रमांक एम एच 40 एन 9164 या बसचा भीषण अपघात झाला आहे. हि बस रोडच्या बाजूला पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. कोण पुलावरून महामार्गावर जाताना वळण घेत असताना बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हि बस रस्त्यावरून खाली झाडांमध्ये पलटी झाली.
या बसमधून तब्बल 46 प्रवासी प्रवास करत होते. महामार्ग पोलीस केंद्राला या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बसच्या पाठीमागील काचा फोडून प्रवासी तसेच त्यांचे सामान बाहेर काढण्यात आलं. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहेत. तसंच बस चालक देखील गंभीर जखमी असून त्याच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी एमजीएम हॉस्पिटल कळंबोली या ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तात्काळ मदत करत सर्व प्रवाशांना त्यांच्या सामानासह सुखरूप बाहेर काढलं. भांबावलेल्या प्रवाशांना आधार देण्याचं मुलाचं कार्य महामार्ग पोलिसांनी केलं प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून त्यांना पर्यायी वाहनांची देखील व्यवस्था करून देण्यात आली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
Comments