टीईटी परीक्षेबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार परीक्षा...
- MahaLive News
- Jul 21, 2021
- 1 min read

मुंबई- राज्यातील शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. शिक्षक भरतीस पात्र ठरण्यासाठी होणारी परीक्षा अर्थात टीईटी घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा १५ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. तर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. ️ शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात ६ हजार १०० जागा भरणार आहे. टीईटी परीक्षा दोन वर्षांनतर घेण्यात येत आहे. कोरोनामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती. दोन वर्षानंतर ही परीक्षा होणार आहे. २०१८-१९ मध्ये शेवटची परीक्षा झाली होती. कोरोना संसर्गामुळे गेल्या दोन वर्षांपासून परीक्षेचे आयोजन केलेले नसल्यामुळे टीईटी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी ७ लाख विद्यार्थी या परीक्षेला बसतात. दोन वर्षाच्या गॅपमुळे १० लाख यावेळी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे.🧐 साधारपणे टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ८ वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य केलेली आहे, अशा दोन गटांसाठी ही परीक्षा घेण्यात येते. काही विद्यार्थी एका गटाची परीक्षा देतात तर काही विद्यार्थी दोन्ही गटांसाठीची परीक्षा देतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण विभाग टप्प्याटप्प्याने या जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात ६ हजार १०० जागा भरणार आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments