आयटीआयला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; प्रवेशासाठी १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध...
- MahaLive News
- Jul 21, 2021
- 1 min read

मुंबई- राज्यातील ४१७ शासकीय आणि ५४९ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी (आयटीआय) व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. यंदा शासकीय आयटीआयमध्ये ९२ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ४४ हजार अशा एकूण १ लाख ३६ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. राज्यातील आयटीआयमध्ये प्रवेशासाठी एकूण ९१ प्रकारचे व्यवसाय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यापैकी ८० अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण, तर ११ अभ्यासक्रमांसाठी दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण विद्यार्थी पात्र असतील. ️ प्रवेश प्रक्रिया, नियमावली, आवश्यक कागदपत्रे, संस्थांची यादी, अभ्यासक्रम, प्रवेश पात्रता माहिती https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचे शुल्क भरण्यासाठी संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने कागदपत्र तपासणी, प्रवेश अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी प्रत्यक्ष संस्थेत जाण्याची गरज नाही. दरम्यान, दहावीचे गुण आणि प्रवेश नियमावलीनुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज मुंबई
Mahalive News
Comments