top of page

10वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी विशेष वेबिनार सुरू; शिक्षणमंत्री...


ree

मुंबई- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी वेबिनारचं आयोजन केलं आहे. १६ जूनपासून या वेबिनारला सुरुवात झाली आहे. हे वेबिनार महाराष्ट्र सरकारच्या SCERT YouTube Channel वरुन प्रसारित केलं जाणार आहे. या वेबिनार सिरीजमध्ये घेण्यात येणाऱ्या विषयांची यादी परिषदेनं जाहीर केली आहे. ज्यात इच्छुक विद्यार्थी भाग घेऊ शकतात आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेऊ शकतात.

ree

तसेच, सदर वेळापत्रक आपल्या संपर्कातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत शेअर करण्यासही सांगितलं आहे. महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार, करिअर मार्गदर्शनासंदर्भात सेशन जॉईन करण्यासाठी संबंधित माहिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरुन मिळेल, असं आवाहनही संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे SCERT यांनी केलं आहे. दरम्यान, यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्वीट करुन माहिती दिली आहे.

तसेच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये या वेबिनारचं संपूर्ण वेळापत्रकही शेअर केलं आहे. वर्षा गायकवाड ट्वीटमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हणाल्या की, 'इ. 10वी व इ. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर विविध विषयांवरील विशेष वेबिनार आजपासून सुरू होत आहेत. @scertmaha मार्फत सुरु करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभाग व्हा, ट्वीट करुन माहिती दिली आहे.


जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page