top of page

पुणे शहराप्रमाणे आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी...


ree

पुणे- शहराप्रमाणे आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. ग्रामीण भागात २६ कोव्हिड केअर सेंटर, समर्पित कोव्हिड आरोग्य केंद्र, समर्पित कोव्हिड रुग्णालयांसह १५ खासगी रुग्णालये अशा ४१ रुग्णालयांत ७७४ खाटांची सुविधा तयार करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांत या खाटांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी सरकारी; तसेच खासगी रुग्णालयांत लहान मुलांच्या उपचारासाठी ऑक्सिजनसज्ज खाटा, नवजात शिशूसाठी खाटा; तसेच व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. त्यासाठी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, नगरपालिका कार्यक्षेत्रातील ग्रामीण रुग्णालयांत लहान मुलांच्या उपचारासाठी खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.जिल्ह्यातील २६ कोव्हिड केअर केंद्रांमध्ये ६१९ खाटांची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. त्यात ऑक्सिजन विरहित ३४२ खाटा, ऑक्सिजनयुक्त १३८ खाटा, अतिदक्षता विभागातील १०४ खाटा, व्हेंटिलेटर खाटांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील १५ खासगी रुग्णालयांत १५५ खाटा उपलब्ध केल्या आहेत. त्यात ऑक्सिजनविरहित ८० खाटा, ३७ ऑक्सिजनयुक्त खाटा, अतिदक्षता विभागातील १८ खाटा; तसेच १५ व्हेंटिलेटरच्या १५ खाटा आहेत. जिल्ह्यात लहान मुलांवर उपचार करण्यासाठी १२० बालरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिली.

यश खताळ महालाईव्ह न्युज दौंड

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page