पुण्यात आजपासून काय सुरू, काय बंद? जाणून घ्या एका क्लिक वरती...
- MahaLive News
- Jun 14, 2021
- 1 min read

पुणे- अत्यावश्यक सेवेसह सर्व प्रकारची दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. तर हॉटेल्स, बार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील. त्यात क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहक असल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पीएमपीची बससेवा रात्री १० वाजून ३० मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे. शहरात रात्री दहानंतर संचारबंदी लागू असेल, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. आंतरजिल्हा वाहतूकही खुली केली आहे.

(सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार)
- सर्व प्रकारची दुकाने
- अभ्यासिका, ग्रंथालय (५० टक्के क्षमतेने)
- सार्वजनिक वाचनालये, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण संस्था (आसन क्षमतेच्या ५० टक्के)
- मॉल (५० टक्के क्षमतेने)
- व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, आठवड्याचे सर्व दिवस (क्षमतेच्या ५० टक्के)
- मद्यविक्रीची दुकाने
- खासगी कार्यालये (५० टक्के क्षमतेने)
- आऊटडोअर खेळ आठवड्याचे सर्व दिवस
- इनडोअर खेळ सकाळी ५ ते ९ व दुपारी ५ ते ७ या वेळेत
- सामाजिक, धार्मिक, राजकीय, मनोरंजन कार्यक्रमासाठी ५० लोक
- लग्नासाठी हॉलच्या ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती
- अंत्यविधी, दशक्रियाविधी - २० लोक
- महापालिकेच्या सभा, बैठका, सहकारी संस्थांच्या मुख्यसभा - ५० टक्के उपस्थितीत
- महापालिकेच्या बागा, क्रीडांगणे पहाटे ५ ते सकाळी ९ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७
- रेस्टॉरंट, बार, हॉटेल रात्री १० पर्यंत (आसनक्षमतेच्या ५० टक्के)
- पीएमपीची बससेवा रात्री १०.३० वाजेपर्यंत
- उद्योग नियमितपणे सुरू राहतील
चित्रपटगृह, नाट्यगृहे बंद
शहरातील मॉल सुरू होणार असले, तरी चित्रपटगृहे व नाट्यगृहे अद्यापही सुरू करण्यास मान्यता देण्यात आलेली नाही.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
महालाईव्ह न्युज पुणे
Comments