राज्यात परतीचा पाऊस उघडण्याची शक्यता; उद्यापासून पाऊस उघडणार, हवामान विभागाचा अंदाज...
- MahaLive News
- Oct 14, 2022
- 1 min read

मुंबई- राज्यात सध्या परतीचा पाऊस कोसळत आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी नद्या, नाले भरून वाहत आहेत. आजपासूनच परतीचा मान्सून माघारी फिरणार असून त्यामुळं उद्यापासून राज्यात उघडीपीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परतीच्या पावसाचा शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अन्य ठिकाणी मात्र, परतीच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता नाही. मात्र, सध्या मुंबईसह ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यात शेती पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. सध्या खरीपाच्या पिकांची काढणी सुरु आहे. सोयाबीन, कापूस, मूग तसेच भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Comments