top of page

संसदेचं पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट; १९ दिवस कामकाज सुरू असणार...


ree

मुंबई- संसदेचे यंदाचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत चालणार असून यामंध्ये १९ कामकाजाचे दिवस असणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली होती. या अधिवेशनात, सरकार अनेक बिलं सादर करु शकते. कोरोना, कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात. अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी कोरोना लसीचा किमान एक डोस घेतला की नाही? तपासलं जाणार आहे. राज्यसभेच्या सचिवालयाच्या नियोजनानुसार वरिष्ठ सभागृहातील सदस्य हे दोन्ही सभागृहाचे सदस्य हे चेंबर आणि गॅलरीमध्ये अधिवेशनादरम्यान बसले होते. संसदेच्या इतिहासात १९५२ नंतर प्रथमच अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. चेंबरमध्ये ६० सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर राज्यसभेच्या गॅलरीत ५१ सदस्य बसण्याची व्यवस्था होती. तर उर्वरित १३२ सदस्य हे लोकसभेच्या चेंबरमध्ये बसण्याचे नियोजन होते. बैठक व्यवस्थेचे नियोजन हे लोकसभेच्या सचिवालयाकडून करण्यात आले होते. पहिल्यांदाच मोठे स्क्रिन, दोन्ही सभागृहामध्ये विशेष केबल आणि विभागणी करणारे पॉलिकार्बोनेट बसविण्यात आले होते.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

महालाईव्ह न्युज मुंबई

ree

Mahalive News


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page