विद्यार्थ्यांच्या फी माफीसाठी वंचित बहुजन आघाडी दौंड शहर व तालुका यांच्या वतीने हलगी नाद आंदोलना...
- MahaLive News
- Jun 11, 2021
- 1 min read

पुणे- गेल्या एक वर्षापासून देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे, दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेलेले आहेत, अनेकांच्या उद्योग धंदे उध्वस्त झालेले आहेत, आर्थिक बजेट ढासळलेले आहे आणि आशा परिस्थितीत खाजगी शैक्षणिक संस्था पालकांकडून पाठाणी पद्धतीने फी वसूल करत आहेत. ही मोठी दुर्दैवी बाब झोपलेला शासनाला निदर्शनास आणून देण्यासाठी हे हालगी नाद आंदोलन करावे लागत आहे असे अश्विन भाऊ वाघमारे, दौंड तालुका अध्यक्ष यांनी महालाईव्ह न्युजशी बोलताना केले आहे.

विद्यार्थींची फी माफ झाली च पाहिजे, या खाजगी शिक्षण संस्थांचा करायचा काय, खाली डोकं वर पाय अश्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अश्विन वाघमारे, उपाध्यक्ष रमेश तांबे तालुका सचिव अजिंक्य गायकवाड दौंड शहर मुख्य सचिव अक्षय शिखरे राहुल नायडू सचिन शिपलकर पाटील, शिवा खरारे, विकी कांबळे, जोनेल पाऊल, राजेश ओव्हाळ, राजेश जाधव अभिषेक जाधव, उमेश नडगमकर, रुपेश जगताप, भिमक्रांती सेनेचे अध्यक्ष बंटी वाघमारे, उपाध्यक्ष रितेश सोनवणे, सुरज जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
यश खताळ महालाईव्ह न्युज दौंड
Comments