पुणे येथे ऐतिहासिक महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी छताला व गाळ्यांना भीषण आग...
- MahaLive News
- Jun 11, 2021
- 1 min read

पुणे- पुण्यामध्ये रात्री 12:30 वाजता महात्मा फुले मंडई शुक्रवार पेठ येथे पूर्व दिशेला असणाऱ्या मंडई च्या आतील ब्रिटिश कालीन जुने लाकडी गाळ्यांना व मंडई च्या लाकडी छताला मोठ्या प्रमाणात आग लागली. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्वरित कसबा सब स्टेशन व मध्यवर्ती अग्निशमन कंट्रोल रूम येथून तीन फायर गाड्या रवाना झाल्या व चारही बाजूने अगीवर तीन लाईन होज च्या करून पाण्याचा मारा केला व त्वरित आग आटोक्यात आणली.

सदरची कारवाई फायर ऑफिसर प्रदीप खेडेकर यांच्या नेतृत्वा खाली जवान अतुल मोहिते, प्रदीप पवार, मनीष बोबले, अझीम शेख, स्वप्नील टूले, सुधीर नवले या जावनांनी केली. अत्यंत जलद कारवाई केल्या मुळे आज पुण्यातील एक ऐतिहासिक ठेवा नष्ट होता होता वाचला आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज पुणे

#Mahalive Mahalive News
Comments