top of page

१८ वर्षांवरील सर्वांना मिळणार लस; मुख्यमंत्री ठाकरेंनी मानले केंद्राचे आभार...


ree

#मुंबई- देशात आता कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होणार आहे. या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांना लस दिली जाणार आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. काही दिवसांपूर्वीच मी देशातील 25 वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची गरज असून तसा निर्णय घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती. आज केंद्र शासनाने त्यावर सकारात्मक पाऊल उचलून 18 वर्षे वयापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय जाहीर करून आपल्या मागणीचा विचार केला. त्यासाठी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री यांचे मी मनापासून आभार मानतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच राज्यात या अनुषंगाने पुरेपूर नियोजन केले जाईल आणि लसीचा पुरवठा वेळच्यावेळी मिळत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारने लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यात 16 जानेवारीपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठांना लस दिली जात होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना लसीकरणास सुरूवात झाली.आता 1 मेपासून लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे. देशात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाशी लढण्याचे मुख्य माध्यम म्हणजे देशात लसीकरण वाढविणे आहे. लसींच्या संख्येवर नव्हे तर देशाच्या लोकसंख्येनुसार लसीकरणाच्या टक्केवारीवर आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे. लसीकरणासाठी वयाची अट ठेवू नये, असा सल्ला काँग्रेस नेते मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारला दिला होता. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण करण्यात यावं अशी मागणी केली होती.

@महालाईव्ह न्यूज मुंबई


Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page