top of page

सेवा निवृत्त मोहन; गोस्वामी यांच्याकडून ऑक्सिजन प्लँन्ट निर्मितीसाठी एक लाखाचा धनादेश...

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडून श्री गोस्वामी यांचा सत्कार व आभार; ऑक्सीजन प्लांट उभारणीच्या या सामाजिक कार्यात नागरिकांनी सहभाग घ्यावा...

ree

#लातूर- स्पंदन अक्षय संजीवनी योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यात वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजन प्लांटची उभारणी करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे सेवानिवृत्त अधिकारी मोहन गुलाबगीर गोस्वामी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एक लाखाचा धनादेश सुपूर्द केला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात या धनादेश सुपूर्द कार्यक्रमास सेवा निवृत्त मोहन गोस्वामी यांच्या पत्नी सौ.सुनंदा मोहन गोस्वामी, स्पंदन अक्षय संजीवनी योजनेचे प्रमुख डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ.अशोक अरदवाड, व त्यांच्या टीमचे सदस्य, येथील नेहरु युवा केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते.

ree

यावेळी सेवा निवृत्त मोहन गोस्वामी आपल्या मनोगतात म्हणाले की, जिल्हयात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन प्लँन्टसाठी माझ्या सेवा निवृत्तीच्या बचतीमधून एक लाखाचा धनादेश मी सुपूर्त करत आहे.मी या आगोदर गतवर्षी पी.एम. केअर फंडास एक लाख रुपयाचा धनादेश दिलेला आहे.या धनादेशामुळे ऑक्सिजन निर्मितीस मदत होवून याचा फायदा कोरोना रुग्णांस व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सेवा निवृत्त गोस्वामी व त्यांच्या पत्नी सौ.सुनंदा गोस्वामी यांचा पुष्प गुच्छ देवून सत्कार करुन आभार व्यक्त केले. स्पंदन अक्षय संजीवनी योजनेचा हा ऑक्सिजन प्लँन्टसाठी वासनगाव शिवारात श्री. गुरुजी आय.टी.आय. यांनी मोफत जागा दिली आहे. हा ऑक्सिजन प्लँट 25 जून 2021 पासून चालू होणार आहे. यामध्ये प्रतिदिन 160 सिलेंडर उत्पादनाची क्षमता आहे. सदरील सिलेंडर ना नफा ना तोटा या तत्वावर देण्यात येणार आहे.ज्या रुग्णांना घरी ऑक्सिजन लागेल अशा रुग्णांना मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्यात येणार आहे असे यावेळी डॉ.विश्वास कुलकर्णी यांनी सांगितले. स्पंदन अक्षय संजीवनी योजनेअंतर्गत अक्सिजन प्लेन ची निर्मिती करण्याचा उपक्रम राबवला जात आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे या सामाजिक उपक्रमासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी करून या प्लांट साठी मदत करणाऱ्या श्री गोस्वामी दाम्पत्याचे त्यांनी कौतुक करून आभारही मानले व श्री गोस्वामी यांचा आदर्श लातूर जिल्ह्यातील इतर नागरिकांनी ही घ्यावा असेही त्यांनी आवाहन केले.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज लातूर

ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

सुरक्षित, समृद्ध आणि स्वच्छ निलंगा शहरासाठी - "भव्य विजय संकल्प सभा' | Mahalive Special Report
bottom of page