शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पुजन...
- MahaLive News
- Jun 6, 2021
- 1 min read
जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या वतीने शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात साजरा...

लातूर- राज्य शासनाच्या वतीने 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष श्रीमती भारतबाई साळुंखे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सा.) प्रभू जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उदयसिंह साळुंके यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती साळुंखे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली व त्यानंतर गुढीचे पूजन करून सर्व उपस्थित पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवाद तज्ञ उद्धव फड यांनी केले. 6 जून शिवराज्याभिषेक दिन हा राज्य शासनाच्यावतीने शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येत असून लातूर जिल्ह्यातील सर्व दहा पंचायत समितीच्या प्रांगणात या दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments