शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते पूजन...
- MahaLive News
- Jun 6, 2021
- 1 min read

लातूर- राज्य शासनाच्या वतीने 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून राज्यात सर्वत्र साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने उदगीर पंचायत समितीच्या प्रांगणात पर्यावरण व पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचे पूजन करण्यात आले.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार रामेश्वर गोरे, बसवराज पाटील नागराळकर, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, प्रा. श्याम डावळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 6 जून शिवराज्याभिषेक दिन हा राज्य शासनाच्यावतीने शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येत असून लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह सर्व दहा पंचायत समितीच्या प्रांगणात या दिनानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून हा दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला..
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments