top of page

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पोस्ट कोविड संशोधन केंद्राची स्थापना...


ree

#लातूर- 1 जून 2021 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पोस्ट कोविड रुग्णांसाठी बाहयरुग्ण विभाग व पोस्ट कोविड संशोधन केंद्राचे उदघाटन या संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पोस्ट कोविड ओ. पी. डी. दररोज सकाळी 09 ते 01 या कालावधीमध्ये बाहय रुग्ण विभागाच्या ईमारतीमध्ये चालु राहील. पोस्ट कोविड रुग्णांना सुट्टी मिळाल्यानंतर सातव्या व चौदाव्या दिवशी या ओ. पी. डी. मध्ये फेरतपासणी करण्यात येईल.

ree

त्यावेळी फुप्फुसाची तपासणी स्पायरोमेट्रीद्वारे योग्य रुग्णांची मोफत तपासणी करुन उपचाराबाबत सल्ला देण्यात येईल. याद्वारे पोस्ट कोविड फायब्रॉसिस व फुप्फुसाची क्षमता तपासणीसाठी मदत होईल. यासोबतच गरज असलेल्या रुग्णांची टु. डी. ईकोकार्डिओग्राफी, सी. टी. स्कॅन तपासणी मोफत करण्यात येईल. या पोस्ट कोविड बाहयरुग्ण विभागाचे प्रभारी म्हणुन श्वसनविकारतज्ञ तथा सहाय्यक प्राध्यापक क्षयरोग व उररोग विभाग डॉ. अभिजित यादव हे कामकाज पाहतील. पोस्ट कोविड संशोधन केंद्राच्या उदघाटना प्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोष डोपे, अतिरीक्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव बनसुडेयांनी समन्वय म्हणुन कामकाज पाहिले.यावेळी डॉ.निलिमा देशपांडे विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभाग, बालरोग विभागप्रमुख डॉ. शिवप्रसाद मुंदडा, डॉ. चंद्रकांत रायभोगे, डॉ. गजानन हलकंचे, डॉ. मेघराज चावडा, डॉ. सदानंद कांबळे, डॉ. अशिष चेपुरे, डॉ. गवळी व ईतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते..

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज मुंबई


ree

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page