वीज कोसळून लागली आग; सुदैवाने शेतकरी बचावला, लाखोंचे नुकसान...
- MahaLive News
- May 2, 2021
- 1 min read

#बीड- तालुक्यातील बहुतांश भागात मेघगर्जनेसह जोरदार अवकाळी पाऊस झाला. यातच शनिवार (ता.एक) दुपारी झालेल्या अवकाळी पावसात चंदनसावरगाव शिवारातील वस्तीवर आकाशातून अचानक वीज कोसळली. यात शेतकरी बचावला. मात्र वीज कोसळून लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे सोयाबीन, हरभरा, गव्हू, कडब्याची गंज, पिकांना पाणी देण्यासाठी लागणारे पाईप व दुचाकीसह शेतातील संपूर्ण निवाराच आगीत जळून खाक झाला. अग्निशामक दलाच्या बंबने आग आटोक्यात आणल्याने आसपासच्या शेतकऱ्यांचा धोका टळला आहे. तालुक्यातील चंदनसावरगाव शिवारातील येथील शेतकरी तुकाराम साहेबराव तपसे यांच्या शेतातील घरावर शनिवारी दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसात वीज कोसळली. यात शेतातील घरात ठेलेले सोयाबीन, हरभरा, गव्हू, पिकांना पाणी देण्यासाठी लागणारे पाईप, दुचाकीस कडब्याची लावलेली गंजी जळून खाक झाली. या घटनेत शेतकरी सुदैवाने बचावला आहे. यावेळी लागलेल्या आगीने क्षणार्धात उग्ररूप धारण केल्याने आसपासच्या वस्तीलाच धोका निर्माण झाला होता. आगीच्या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. थोड्याच वेळात अग्निशामक दलाचे वाहन दाखल झाल्याने आग आटोक्यात येऊन पुढील अनर्थ टळला. मात्र तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतातील घराचे व साहित्याचे लाखोंचे नुकसान झाले होते. मागील पावसाळ्यात अंगावर वीज पडून एका तरूण शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता. यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज बीड
Comments