लातूरचे ग्रामदैवत श्री.सिध्देश्वर देवस्थानात उभारणार जंबो कोव्हीड सेंटर; १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध...
- MahaLive News
- Apr 24, 2021
- 1 min read

#लातूर- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, या वाढत्या प्रादुर्भावामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खाटांची कमी भासत आहे, रुग्णांना बेड मिळत नाहीये तर काहींना खासगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागत आहे, यामुळे जिल्ह्याला एक मोठ्या कोव्हीड सेंटरची उभारणी करणे आवश्यक असल्याचे बोलले जात होते. शेवटी ती मागणी पूर्ण होणार आहे. लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे ग्रामदैवत श्री.सिध्देश्वर देवस्थान येथे नवीन जंबो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. याठिकाणी लातूरच्या जनतेसाठी १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध असणार आहेत. लवकरच हे जंबो कोविड सेंटर लवकरच लातूरवासीयांच्या सेवेत रुजू होईल.यामुळे येणाऱ्या काळात लातूरकराना होणारा त्रास काम होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. येणाऱ्या काही दिवसात कोरोना महामारीचा पीक येणार अशी अपेक्षा तंज्ञानी व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन प्रशासन नागरिकांना करत आहे, सतर्कतेचा इशारा समजून नागरिकांनी आताच सावध राहायला हवे. त्याचबरोबर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आता पासूनच तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून जम्बो कोव्हीड सेंटरची उभारणी करण्यात येत आहे.
@महालाईव्ह न्युज लातूर
Comments