लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात ५० जणांचा मृत्यू तर १८१३ जणांना कोरोनाची लागण; ५५३७१ पॉसिटीव्ह...
- MahaLive News

- Apr 18, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात रविवारी एकूण १६३४ आरटीपीसीआर चाचणी व ४०१३ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १८१३ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ५५ हजार ३७१ झाली आहे. आणि, आज ५० मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १८१३ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ५५ हजार ३७१ झाली. आतापर्यंत ३८ हजार २८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ९३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १६१४९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७८७ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील २१३१ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील १४५० ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ११७८१ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १६१४९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १६३४
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ४०१३
आजचे रूग्ण - १८१३
एकुण रूग्ण - ५५३७१
बरे झालेले रूग्ण - ३८२८८
ऍक्टिव्ह रुग्ण - १६१४९
आजचे मृत्यू - ५०
एकुण मृत्यू - ९३४
@महालाईव्ह न्यूज लातूर
























Comments