लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्ह्यात २७ जणांचा मृत्यू तर १४०० जणांना कोरोनाची लागण; ६३९९७ पॉसिटीव्ह...
- MahaLive News
- Apr 24, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात गुरुवारी एकूण १६२० आरटीपीसीआर चाचणी व ३३०७ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १४०० रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ६३ हजार ९९७ झाली आहे. आणि, आज २७ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १४०० रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ६३ हजार ९९७ झाली. आतापर्यंत ४७ हजार ४३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १५४५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७६५ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १९८१ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील १९०८ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये १०७९७ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १५४५१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १६२०
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३३०७
आजचे रूग्ण - १४००
एकुण रूग्ण - ६३९९७
बरे झालेले रूग्ण - ४७४३९
ऍक्टिव्ह रुग्ण - १५४५१
आजचे मृत्यू - २७
एकुण मृत्यू - ११०७
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments