लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्यात विक्रमी आकडा, १६४७ जणांना कोरोनाची लागण; ४३६२२ पॉसिटीव्ह रूग्ण...
- MahaLive News
- Apr 11, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १९०८ आरटीपीसीआर चाचणी व ३९७९ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १६४७ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ४३ हजार ६२२ झाली आहे. आणि, आज ३ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १६४७ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ४३ हजार ६२२ झाली. आतापर्यंत ३२ हजार ६५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १०१६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ५९२ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १६०४ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ७५८ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ७२०६ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १०१६० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १९०८
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३९७९
आजचे रूग्ण - १६४७
एकुण रूग्ण - ४३६२२
बरे झालेले रूग्ण - ३२६५५
ऍक्टिव्ह रुग्ण - १०१६०
आजचे मृत्यू - ३
एकुण मृत्यू - ८०७
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments