लातूरकरांनो काळजी घ्या; जिल्यात आज १६६३ जणांना कोरोनाची लागण; ५०१९० पॉसिटीव्ह रूग्ण...
- MahaLive News
- Apr 15, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १५८८ आरटीपीसीआर चाचणी व ३४३१ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १६६३ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ५० हजार १९० झाली आहे. आणि, आज १८ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १६६३ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ५० हजार १९० झाली. आतापर्यंत ३५ हजार ४९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १३८५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ६९८ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील १९७३ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील ९९३ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये १०१९४ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १३८५८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - १५८८
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३४३१
आजचे रूग्ण - १६६३
एकुण रूग्ण - ५०१९०
बरे झालेले रूग्ण - ३५४९३
ऍक्टिव्ह रुग्ण - १३८५८
आजचे मृत्यू - १८
एकुण मृत्यू - ८३९
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments