लातूरकरांनो काळजी घ्या; चिंताजनक आकडा आज १६४३ जणांना कोरोनाची लागण; ५३५६६ पॉसिटीव्ह रूग्ण...
- MahaLive News
- Apr 17, 2021
- 1 min read

#लातूर- जिल्ह्यात शनिवारी एकूण २०५८ आरटीपीसीआर चाचणी व ३१७१ रॅपिड अँटीजेन चाचणी झाल्या, असे दोन्ही मिळून एकूण नवीन १६४३ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यात रुग्णसंख्या ५३ हजार ५६६ झाली आहे. आणि, आज २५ मृत्यूची नोंद झाली आहे. या नवीन १६४३ रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या आता ५३ हजार ५६६ झाली. आतापर्यंत ३७ हजार ३०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ८८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्यात एकूण १५३७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी (डी.सी.एच) मधील ७८७ ऍक्टिव्ह रुग्ण, (सी.सी.सी) मधील २०५४ ऍक्टिव्ह रुग्ण, (डी.सी.एच.सी) मधील १३२८ ऍक्टिव्ह रुग्ण व होम आयसोलेशन मध्ये ११२०५ ऍक्टिव्ह रुग्ण, असे मिळून जिल्यात एकूण १५३७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
लातूर कोरोना मीटर
आज एकूण आरटीपीसीआर चाचणी - २०५८
आज एकूण रॅपिड अँटीजेन चाचणी - ३१७१
आजचे रूग्ण - १६४३
एकुण रूग्ण - ५३५६६
बरे झालेले रूग्ण - ३७३०८
ऍक्टिव्ह रुग्ण - १५३७४
आजचे मृत्यू - २५
एकुण मृत्यू - ८८४
@महालाईव्ह न्यूज लातूर
Comments