top of page

लातूर महापालिकेचे आयुक्त उतरले रस्त्यावर; दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही उघडणाऱ्यांवर कारवाई...


ree

#लातूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही शहरातील काही दुकानदार दुकाने उघडे करून विक्री करीत आहेत. मंगळवारी (ता. १३) आयुक्त अमन मित्तल रस्त्यावर उतरले. त्यांनी बाजारपेठेत भेट देऊन अनेकांवर कारवाई केली; तसेच सराफ लाइनमधील दोन दुकानेही सील केली आहेत. शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातून मिनी लॉकडाउन सुरू आहे. जीवनावश्यक वस्तू विक्रीलाच परवानगी आहे. असे असताना काही दुकानदार दुकान अर्धवट उघडून मालाची विक्री करीत आहेत. हे लक्षात आल्यानंतर महापालिकेचे आयुक्त अमन मित्तल हे मंगळवारी रस्त्यावर उतरले. त्यांनी गंजगोलाई येथे पाहणी केली. या परिसरात अनेक गाडे उभे असले त्यांच्या निदर्शनास आले. ते गाडे त्यांनी हटवले. सोन्या चांदीचे दुकाने चालू असताना आढळून आली. त्यांच्यावर कार्यवाही करून दोन दुकाने सील करण्यात आली. दोन दुकानदारांकडून ४० हजार रुपये दंड भरून घेण्यात आला. यावेळी झोन डीचे झोनल प्रमुख बंडू किसवे, सी झोनचे समाधान सूर्यवंशी, अतिक्रमण विभाग शेख आमजद शेख, हिरा कांबळे, नीलेश शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page