top of page

लातूर जिल्ह्यामध्ये ८ मे रोजी सकाळी ७ वाजेपासून ते १३ मे दरम्यान कडक निर्बंध...


ree

#लातूर- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी कठोर पावले उचलली आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी "ब्रेक द चेन" या अंतर्गत दिनांक ८ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपासून दिनांक १३ मे २०२१ रोजी पर्यंत कडक निर्बंधाचे आदेश लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले आहेत.

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. त्यात कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय बाहेर पडन्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच हे कडक निर्बंध आठवड्यातील शनिवार व रविवार या विकेंड लॉकडाऊन प्रमाणे असेल, सर्व किराणा सामान, भाजीपाला दुकान, फळ विक्रेते, अंडी, मधालय, मध दुकाने व बार बंद राहणार असून किराणा व भाजीपाल्याची घरपोच सेवा सकाळी ७ ते ११ दरम्यान सुरू राहणार आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, शिवभोजन थाळीही घरपोच देता येणार आहे. तर कृषी उत्पादन बाजार समिती, भाजी मंडई व आठवडी बाजारही बंध राहणार आहेत.

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page