लातूर जिल्ह्यात दिव्यांग नागरिकांसाठी टाऊन हॉल येथे लसीकरण…
- MahaLive News
- May 18, 2021
- 1 min read

#लातूर– लातूर शहर महानगरपालिके मार्फत दिनांक 18 मे 2021 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे 18 वर्षावरील दिव्यांग नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस ऑन स्पॉट सकाळी 10 ते सायं.5.00 या कालावधीत देण्यात येणार आहे.

टाऊन हॉल येथे दिव्यांग नागरिक ज्या वाहनांमध्ये आलेले असतील त्या वाहनामध्येच लस देण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे, अशी माहिती उपायुक्त, लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी दिली आहे. त्याप्रमाणेच 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण केंद्र आयोजित केलेले नाहीत. तसेच लस उपलब्ध् नसल्याने शहरातील सर्व लसीकरण केंद्र 18 मे 2021 रोजी बंद राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे ही महापालिकेने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज लातूर
Comments