top of page

लोकल, बस प्रवासावर येणार निर्बंध; राज्य सरकारची नवी नियमावली दोन दिवसांत...


ree

#मुंबई- राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतो आहे. वाढत्या संक्रमणामुळे चिंतेची परिस्थिती उद्भवली आहे. नागरिकांकडून शासनाच्या नियमांना हरताळ फासला जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा लोकल, बस प्रवासावर निर्बंध लादण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या रविवारपासून (२ एप्रिल) ही नियमावली लागू करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लॉकडाऊन टाळायचा असेल तर मास्क घालावा, हात धुवावे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने करत आहेत. परंतु, नागरिकांकडून नियमांचे पालन होत नाही. परिणामी रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे बेड, व्हेंटिलेटर, आरोग्य सुविधांची कमतरता निर्माण होईल, अशी भीती टास्क फोर्सने वर्तवली आहे. म्हणून गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल, बीच, उद्याने, सभागृह आणि मॉल्सना ठराविक कालावधीसाठी मंजुरी दिली आहे. आता ते देखील काही कालावधीसाठी २४ तास बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल. दुकाने, बाजारपेठा, फेरीवाल्यांकरिता मार्गदर्शक सूचना लागू केल्या जातील. तसेच, मुंबईकरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या लोकल आणि बस प्रवासावर निर्बंध घातले जातील. उपनगरी लांब पल्ल्याच्या गाड्या आणि सार्वजनिक परिवहन बसेस करिता कठोर मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जातील. रेल्वे स्थानक आणि विमानतळांवर कोविड चाचणी अधिक तीव्र करण्याबाबतच्या उपाययोजना राज्य सरकार आखत आहे. उद्योगधंदे, सेक्टर हाऊसना पूर्ण क्षमतेने काम करण्यास अनुमती दिली जाईल. मात्र, त्यासाठी कोरोना चाचणी आणि नियमावलीचे पालन करणे सक्तीचे असेल, अशी नवीन नियमावली असू शकते. याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. रोज वाढणाऱ्या नव्या रुग्णसंख्येने सरकारची डोकेदुखी वाढवली आहे. केंद्रशासित प्रदेशातील ४६ जिल्ह्यांमध्ये जवळपास ७१ टक्के रुग्ण आहेत. तर ६९ टक्के मृत्यू झाले आहेत. यात सर्वाधिक महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा समावेश आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याचा पर्याय टास्क फोर्स समितीने सुचवला आहे. मात्र, लॉकडाऊन राज्याला परवडणारा नाही. नोकरी-धंदे जातील. अर्थ व्यवस्था कोलमडून पडेल, असा सूर सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पक्षातूनही उमटत आहे.


अशा असतील नवीन मार्गदर्शक सूचना - - नाईट कर्फ्यू रात्री ९ ते सकाळी ९ - लोकल, बसमध्ये उभ्या प्रवाशांना प्रवेश बंदी - कार्यालयांना २५ टक्के हजेरीची मर्यादा - कार्यक्रम, सभा घेण्यास मनाई - धार्मिक ठिकाणे बंद - ऑफिसला जाण्यासाठी ई- पास बंधनकारक आणि प्रत्येकाला कोविड चाचणीची सक्ती - एका बाजूची दुकाने एक दिवसाआड उघडण्यास परवानगी - खुल्या बाजारपेठा बंद ठेवाव्या लागणार - दंडात्मक रक्कमेत वाढ होणार - होम क्वॉरंटाईन नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा.

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page