top of page

राज्य महामार्गावर धावत्या कंटेनरने अचानक घेतला पेट; औषध गोळ्याचे मोठे नुकसान...


ree

#हिंगोली- हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर माळवहिवरा पाटीजवळ एका धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतला. कंटेनरने पेट घेताच मोठा भडका उडाला. चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर रस्त्याच्या कडेला थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. हिंगोली - वाशिम राज्य महामार्गावर धावत्या कंटेनरने अचानक पेट घेतल्यामुळे काही काळ वाहतूक खोळबली होती. हैद्राबादच्या दिशेने के जे 25 डी 9436 क्रमांकाचा कंटेनर जात होता. माळहिवरा पाटी जवळ कंटेनर पोहचताच कंटेनरला आग लागली. चालकाने रस्त्याच्या कडेला कंटेनर थांबवून त्यातून बाहेर पडला. त्यामुळे चालकाचे प्राण वाचले. जवळपासच्या लोकांच्या ही घटना लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाने ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीत कंटेनरमधील मालाचे चळून मोठे नुकसान झाले आहे. आगीत औषध गोळ्या आणि कपड्यांची वाहतूक केली जात होती. अशी माहिती मिळतेय. भर रस्त्यात लागलेल्या आगीमुळे तासभर दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.

@महालाईव्ह न्यूज हिंगोली

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page