राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढणार?; राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती...
- MahaLive News
- Apr 28, 2021
- 1 min read

#मुंबई- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. या लाटेवर नियंत्रण मिळावं म्हणून महाराष्ट्रात 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन आहे. अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. भाजीपाला, इतर दुकानं ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सध्या राज्यात सुरू आहेत. अशात हे निर्बंध 1 मेनंतर उठवले जातील का? असा प्रश्न विचारला जात असताना राज्यात दररोज 60 हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद लॉकडाऊनच्या काळात मिळालेला नाही. लोक सर्रासपणे कोरोना निर्बंधांचे उल्लंघन करत आहेत. अशात राज्यात लॉकडाऊन वाढवला जाण्याची दाट शक्यता होती. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठे विधान केले आहे. राज्यातील लॉकडाऊन 15 मेपर्यंत वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. याआधी 1 मेपर्यंत लॉकडाऊन लागून करण्यात आला होता. पण, राज्यातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेता तो आणखी 15 दिवस वाढवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम निर्णय शेवटच्या दिवशी घेण्यात येईल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं सरसकट लसीकरण केलं जाणार आहे. तब्बल ५ कोटी ७१ लाख जनतेचं मोफत लसीकरण केलं जाणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील जनतेचं लसीकरण राज्य सरकारमार्फत केलं जाणार आहे. याचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असून लसीकरणाच्या खर्चासाठी ६५०० कोटी रुपये सरकारतर्फे खर्च करण्यात येणार आहे. अस देखील टोपे म्हणाले आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here...
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments