top of page

राज्यात लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नाहीच; निर्णय घेण्याची वेळी आलीय, मुख्यमंत्र्यांचं थेट भाष्य...


ree

#मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगदी दोनच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. संपूर्ण लॉकडाऊनची वेळ आली आहे. निर्णय घेण्याशिवाय आता पर्याय नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आज राज्यात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू होताच राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचं सादरीकरण केलं. राज्यातील रुग्ण, मृतांचा आकडा, औषधांचा उलब्ध साठा, लसीकरणाची माहिती आणि संसर्गाचा धोका, आदीबाबतची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नसेल तर सांगितलं. राज्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रुग्ण संख्या नियंत्रणात आणावी लागेल. रुग्ण संख्या नियंत्रणात आणायची असेल तर कोरोनाची साखळी तोडावी लागणार आहे. त्यासाठी लॉकडाऊन हाच पर्याय आहे. त्याबाबतचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, लोकांचं येणं जाणं थांबलं पाहिजे, कार्यालयाच्या वेळा बदलल्या पाहिजे. घरातूनच कामाचं नियोजन झालं पाहिजे. पीक अवर ही संकल्पनाही बदलली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

@महालाईव्ह न्यूज मुंबई

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी शिवारात आढळली साडेआठ फुटाची अंदाजे 100 किलोची मगर.
bottom of page