Search
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट; ४८ हजार २११ रुग्ण बरे, ५१६ रुग्णांचा मृत्यू…
- MahaLive News
- May 18, 2021
- 1 min read

#मुंबई– राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढीला ब्रेक लागला असून मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाट्याने खाली येत आहे. राज्यात गेल्या २४ तासात २६ हजार ६१६ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. तर दिवसभरात ४८ हजार २११ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

आज राज्यात एकूण ५१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ४५ हजार ४९५ वर आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५३ टक्के इतका आहे. तर आतापर्यंत एकूण ४८ लाख ७४ हजार ५८२ रुग्ण बरे झाले आहेत.
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here… @महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments