Search
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; बस अपघातात मृत्यूमुखी महिलेच्या वारसाला 10 लाख रुपयांची मदत...
- MahaLive News
- Jul 12, 2023
- 1 min read

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगीगड घाटात एस. टी. बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला 10 लाख रुपयांची मदत एसटी महामंडळामार्फत देण्यात येणार आहे, तर या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंतर वणी ग्रामीण रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
Comments