top of page

महाराष्ट्रातील एकमेव गाव जिथे कोरोनाचा शिरकाव झालाच नाही; देवणी तालुक्यात आंनदवाडी गाव…


ree

#लातूर– संपूर्ण देशासह महाराष्ट्र कोरोनाशी झगडतोय, गावागावात कोरोनाने तांडव केले आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील आणि कदाचित राज्यातील पहिलेच असे एक गाव, ज्या गावात कोरोनाचा शिरकाव झालाच नाही, ना गतवर्षी ना आज. एकीकडे सबंध राज्य, राज्यातली गावखेडी आणि देश, कोरोनाच्या महामारीत संकटाचा सामना करता आहेत.

ree

मात्र लातूर जिल्ह्यात आणि कदाचित महाराष्ट्र राज्यात एकमेव गाव असेल जिथे कोरोनाचा शिरकाव झालाच नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेपासून फक्त दीड किलोमीटर असणारे व लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात असलेले आंनदवाडी गाव. गावच्या नावाप्रमाणेच हे गाव आजही आनंदी आहे. कारण गेल्या वर्षभरापूर्वी कोरोनाची सुरुवात झाली. कोरोनाने देशात आणि राज्यातल्या प्रत्येक गावात हाहाकार माजवला. मात्र या गावाची शीव आजपर्यंत कोरोनाने ओलांडलीच नाही. यामागचे कारण देखील तितकेच महत्वाचे आहे. कोरोनाची सुरुवात झाली आणि गावकऱ्यांनी एकच निश्चय केला, कि गावातून कोणीच बाहेर पडायचं नाही . शासनाने ठरवून दिलेले नियम पाळायचे. त्यानुसार हे गाव वागलं आणि सध्या देखील हे गाव कोरोनामुक्तच आहे. या गावाने सुरुवातीपासूनच कोरोनाची नियमावली काटेकोरपणे पाळली, शिवाय कर्नाटक राज्याचा संबंध देखील पूर्णपणे तोंडला. गावातला भाजीपाला, गावातला किराणा आणि वृद्धांच्या औषधांसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायला एकच व्यक्ती जाणार व ते हि पूर्णपणे सुरक्षा ठेवून हे सूत्र गावाने तयार केले. त्यामुळेच आज हे गाव अजुनपण कोरोनामुक्त असल्याचे स्थानिक सांगतात. या गावाचा आदर्श राज्यातल्या सर्वच गावांनी आणि ग्रामस्थांनी घेतल्यास गावातून, शहरातून नव्हे तर राज्यातून कोरोना हद्दपार होण्यास मदत मिळणार आहे.

जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…

@महालाईव्ह न्यूज लातूर

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page