महाराष्ट्रात आतापर्यंत 1 कोटींहून अधिक जणांचे कोरोना लसीकरण...
- MahaLive News
- Apr 11, 2021
- 1 min read

#मुंबई- महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये एक कोटीचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत राज्यात 1 कोटींहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.आतापर्यंत 1 कोटी 38 हजार 421 जणांना लस देण्यात आली असून, सायंकाळपर्यंत या आकडेवारीत अजून वाढ होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांचे वय 45 वर्षांपेक्षा जास्त असून, त्यांना गंभीर आजार आहेत अशा लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. दरम्यान कोरोना लसीकरणाबाबत महाराष्ट्र आघाडीवर असून, आतापर्यंत 1 कोटींपेक्षा जास्त जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. या विक्रमी कामगिरी बद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचे कौतुक केले आहे.
@महालाईव्ह न्यूज मुंबई
Comments