मुलांसह तरुणांवर होणाऱ्या परिणामावर लक्ष ठेवा; PM मोदींच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना…
- MahaLive News
- May 20, 2021
- 1 min read

#परभणी– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या लाटेत किंवा कोरोनाच्या नव्या स्ट्रेंथचा लहान मुले व तरुणांवर काय परिणाम होतोय याची तिक्ष्णपणे तपासणी करावी. कोरोना प्रतिबंधक लसीच्या डोसेस वाया जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी असे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. २०) राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

कोरोना विषाणु संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मराठवाड्यातील परभणीसह बीड, उस्मानाबाद, लातूर व जालना येथील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्या- त्या जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा देखील पंतप्रधानांनी घेतला. सकाळी ११ वाजल्यापासून ही ऑनलाईन बैठक सुरु झाली होती. ती दुपारी अडीच वाजेपर्यंत चालली. या बैठकी दरम्यान, पंतप्रधानांनी प्रत्येक जिल्ह्यातील सध्याची कोरोना स्थिती व उपाययोजना संदर्भात माहिती जाणून घेतली. त्यानंतर पंतप्रधानानी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, आप- आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणु संसर्गाबाबत जनजागृती करावी, समाजिक जबाबदारीचे भान ठेवण्यासाठी सातत्याने लोकांमध्ये जनजागृती करावी. ग्रामीण भागात कोरोना विषाणु संसर्गाला अटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार तातडीने कामे करावीत. ग्रामीण भागातील लोकांना दक्षता घेण्यासंदर्भातही सुचित करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले. लसीकरणासंदर्भात सुचना करतांना पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस वाया जाता कामा नये. यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. ऑक्सीजन पुरवठ्या संदर्भात बोलतांना पंतप्रधानानी कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑक्सीजन प्लॅन्ट बंद पडता कामा नये. कोणत्याही रुग्णालयात ऑक्सीजनचा खंड पडू नये यासाठी विशेष खरबदारी घेण्याचे ही त्यांनी सांगितले.\
सलग अडीत तास पंतप्रधानाचे जिल्हाधिकाऱ्यांशी हितगुज
– ग्रामीण भागावर जास्त लक्ष देण्याचे निर्देश
– लसीचा डोस वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना
– कोरोना काळातील महत्वपूर्ण बाबीचा डेटा गोळा करण्यास सांगितले
– कोरोनाच्या वेगवेगळ्या परिणामावर लक्ष ठेवण्याचे आदेश
जाहिराती साठी संपर्क- ९०९६५०९७७७, Whatsapp group मध्ये join होण्याकरिता click here…
@महालाईव्ह न्यूज परभणी
Comments