top of page

मोठी बातमी; कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन लागणार...


ree

#मुंबई- राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. पण, तरीही लोकांकडून नियम पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्यात आता पूर्णपणे लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे, याबद्दलचा निर्णय झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल घोषणा करणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाची प्रदीर्घ बैठक पार पडली. कडक निर्बंध ऐवजी लॉकडाऊन करावा याबाबत अनेक मंत्र्यांनी आपली भूमिका मांडली. आज राज्यमंत्र्यांना सुद्धा कॅबिनेट बैठकीत बोलवण्यात आलं होतं. लॉकडाऊन बाबत चर्चा झाली आहे. सर्व लशी देण्यासाठी परवानगी मिळावी आहे. यासाठी केंद्राकडे मागणी केली आहे. ऑक्सिजन, लस पुरवठा दिला जाणार आहे. काही तासात लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दल लवकरच घोषणा करणार आहे, अशी माहिती अस्लम शेख यांनी दिली. तर, राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग तोडण्यासाठी आपण कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण, संसर्ग वाढतच असल्यामुळे लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागत आहे, 21 एप्रिलपासून रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. याबद्दलच्या निर्णयाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Comments


Weather

Frequently

Select Your Choice

Live- लाडक्या बाप्पाचे विसर्जन सोहळा- 2025_ Live
bottom of page